Sachin Patange https://www.sachinpatange.com Free and Open Source Software for Education - Digital Initiatives In Higher Education - Web Design | Graphic Design | Video Editing | Animation | Sound & Music Tue, 16 Apr 2024 11:45:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.2 https://www.sachinpatange.com/wp-content/uploads/2022/01/favicon.png Sachin Patange https://www.sachinpatange.com 32 32 Regarding information to be compulsorily self-disclosed by all non-agricultural universities, self-financed universities, deemed universities and institutions of higher education to students and general public. https://www.sachinpatange.com/2024/04/16/mandatory-publication-of-prospectus/ https://www.sachinpatange.com/2024/04/16/mandatory-publication-of-prospectus/#respond Tue, 16 Apr 2024 11:45:12 +0000 https://www.sachinpatange.com/?p=242 Regarding information to be compulsorily self-disclosed by all non-agricultural universities, self-financed universities, deemed universities and institutions of higher education to students and general public.

सर्व अकृषि विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्था यांनी विद्यार्थी व सामान्य जनतेसाठी अनिवार्यपणे स्वयंप्रकटीकरण करावयाच्या माहितीबाबत.

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202402081541467408…pdf

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202402081541467408…pdf

]]>
https://www.sachinpatange.com/2024/04/16/mandatory-publication-of-prospectus/feed/ 0
नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसायाकडे ( भाग ६ ) https://www.sachinpatange.com/2022/01/06/from-a-job-to-your-own-e-commerce-business-part-6/ https://www.sachinpatange.com/2022/01/06/from-a-job-to-your-own-e-commerce-business-part-6/#respond Thu, 06 Jan 2022 16:37:17 +0000 https://www.sachinpatange.com/?p=71 नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसायाकडे ( भाग ६ )

नमस्कार मित्रांनो मी सचिन,
नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करत असताना कालच्या भाग मध्ये आपण आपले प्रॉडक्ट ऑनलाइन पद्धतीने कोणत्या कोणत्या ठिकाणी आपण विक्री करू शकतो या बद्दलची आपण माहिती पाहिली.

आजच्या भागामध्ये आपल्याला आपले अलीबाबा किंवा इतर बी टू बी या वेबसाइटवरून ठोक भावात मागवलेले प्रॉडक्ट हे ऑनलाईन विक्री करण्यासाठी आपण आपल्याला एक फ्री मध्ये वेबसाईट बनवणार आहात आहोत याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत.

यासाठी प्रथम आपल्याला आपल्या मोबाईल वरून किंवा कॉम्प्युटर वरून गुगल ओपन करावे त्यामध्ये वर्डप्रेस हे नाव सर्च करावे वर्डप्रेस नाव सर्च केल्यानंतर आपल्याला डॉट कॉम आणि डॉट ओआरजी या दोन वेगवेगळ्या वेबसाईट दिसून येतील

जेव्हा आपण वर्डप्रेस.com ही वेबसाइट ओपन करून आपल्याला स्टार्ट युवर वेबसाइट फ्री असे बटण दिसेल त्याचबरोबर जेव्हा आपण .org या वेबसाईटवर ती विजीट करून तेव्हा आपल्याला वर्डप्रेस ऑर्गनायझेशन ची वेबसाईट दिसते तर मग या दोन्ही मधला फरक काय

WordPress.com मध्ये आपल्याला वेबसाईट बनवण्यासाठी वर्डप्रेस या डोमेन वरती सब डोमेन मध्ये आपल्याला फ्री मध्ये वेबसाईट बनवता येते

WordPress.org मध्ये हि ऑर्गनायझेशन ची वेबसाईट आहे ऑर्गनायझेशन म्हणजे वर्डप्रेस डॉट कॉम हे ओपन सोर्स सी एम एस प्लॅटफॉर्म आहे म्हणजे हे फ्री आहे याचा जो सोर्स कोड आहे तो सर्वांसाठी ओपन आहे आणि सर्वात लोकप्रिय सी एम एस म्हणजे कन्टेन्ट मॅनेजमेंट सिस्टीम होय यामध्ये आपल्याला वेबसाईट ही फ्री मध्ये बनवता येते त्याच बरोबर यासाठी कोणतीही टेक्निकल किंवा कोडिंग चे नॉलेज असण्याची आवश्यकता नाही
सुरवातीच्या काळामध्ये आपल्याला वेबसाईट म्हणजे काय किंवा ती कशी वर करते याबद्दल माहिती मिळण्याकरिता ट्रायल घेण्याकरिता हे खूप चांगले साधन आहे यामध्ये आपल्याला फ्री अकाउंट मिळते आणि याचे पुढे जाऊन आपण ई-कॉमर्स मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे

यामध्ये आपण ॲड टू कार्ट करणे पेमेंट गेटवे एसएमएस गेटवे अशा सर्व बाबी आपण या मध्ये ऍड करू एक इन्फॉर्मेशन किंवा एक म्हणून आपण आज पासून वर्डप्रेस म्हणजे काय आणि हे कसे वर्क करते याबद्दल आपण येणाऱ्या भागांमध्ये माहिती घेणार आहोत.

काही सूचना असतील तर आपण sachinppatange@gmail.com या ईमेल वरती दयाव्यात… मी प्रथमच लिहण्याचा प्रयत्न करीत आहे .. आपल्या सर्वांच्या मनातील प्रश्न आणि उत्तरे मांडण्याचं प्रयत्न करत आहे ..

धन्यवाद.

 

 

]]>
https://www.sachinpatange.com/2022/01/06/from-a-job-to-your-own-e-commerce-business-part-6/feed/ 0
नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसायाकडे ( भाग ५ ) https://www.sachinpatange.com/2022/01/05/from-a-job-to-your-own-e-commerce-business-part-5/ https://www.sachinpatange.com/2022/01/05/from-a-job-to-your-own-e-commerce-business-part-5/#respond Wed, 05 Jan 2022 14:35:52 +0000 https://www.sachinpatange.com/?p=66 नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसायाकडे ( भाग ५ )

नमस्कार मित्रांनो मी सचिन,
नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करत असताना कालच्या भाग मध्ये आपण अलिलाबा या वेबसाईट वर आपले अकाउंट कसे काढावे या बद्दल माहिती पहिली . आज आपण आपल्या नफा प्रमाणे सर्वानी प्रॉडक्ट ऑर्डर साठी प्रोसेस केली असे समजून पुढील काही दिवसात आपल्या कडे आपले प्रॉडक्ट येतील.

आता आपल्याला ऑनलाईन प्रॉडक्ट ऑनलाईन विकण्यासाठी एका ऑनलाईन दुकान सेटअप करावे लागेल त्या साठी आपल्या कडे खूप ऑपशन आहेत

१. सध्या प्रसिद्ध असलेले ऑनलाईन मार्केटप्लेस जसे उदा. अमेझॉन, फ्लिपकार्ट, फेसबुक

२. सध्या प्रसिद्ध असलेले विविध अँप उदा. Dukaan App

३. आपली स्वतःची मोफत वेबसाइट

४. आपली स्वतःची ई-कॉमर्स वेबसाइट

– सध्या प्रसिद्ध असलेले ऑनलाइन मार्केट प्लेस जसे ॲमेझॉन फ्लिपकार्ट किंवा इतर हे सर्व जण आपल्या प्रोडक्ट ऑनलाइन विक्री करून देतात त्यासाठी आपल्याला यांच्याकडे वेंडर म्हणून रजिस्टर व्हावे लागते तर हे वेंडर म्हणून रजिस्टर होण्यासाठी आपल्याला काही कागदपत्रांची आवश्यकता पूर्ण करणं गरजेचं आहे. ॲमेझॉन फ्लिपकार्ट यासारख्या वेबसाईटवर सेलर म्हणून रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला जीएसटी नंबर हा सर्वात महत्त्वाचा आहे. हा जीएसटी नंबर हा रेगुलर जीएसटी. जेव्हा आपला प्रॉडक्ट विकला जाईल तेव्हा या प्रोडक्ट मधील काही टक्के कमिशन हे या कंपन्या घेऊन उर्वरित रक्कम ही आपल्या खात्यामध्ये जमा करतात यामध्ये प्रत्येक कंपन्यां त्यांचे नियम हे त्या त्या कंपन्यांनी ठरवलेले आहेत. पण सुरुवात करताना आपल्याला एक गोष्ट कंपल्सरी आहे ती जीएसटी नंबर.

– आपला पर्याय क्रमांक दोन सध्या प्रसिद्ध असलेली विविध ॲप जसे दुकान ॲप आहे या ॲप मध्ये जेव्हा आपण सेलर म्हणून रजिस्टर करता तेव्हा आपल्याला जास्त कागदपत्रांची पूर्तता करण्याची आवश्यकता नाही.

– पर्याय क्रमांक तीन यामध्ये आपल्याला आपल्या स्वतःची मोफत वेबसाइट बनवून मिळते जसे वर्डप्रेस आहे विक्स आहे त्याच बरोबर आणखी सारे प्लॅटफॉर्म आहेत की जे प्लॅटफॉर्म आपल्याला मोफत वेबसाइट बनवून देतात. जेव्हा आपण गुगलला माय बिजनेस रजिस्टर करतो तेव्हा आपल्याला गुगल बिझनेस देते याच प्रमाणे या मोफत वेबसाइट या वरती आपण आपला बिझनेस रजिस्टर करून आपल्या व्यवसायाबद्दलची आपल्या प्रॉडक्ट बद्दलची आपण माहिती देऊ शकतो पण जेव्हा एखाद्या ग्राहकाला ऑर्डर करायची असते तेव्हा तो आपल्याला डायरेक्ट संपर्क करून ऑर्डर करू शकतो.

पर्याय क्रमांक चार यामध्ये आपल्या स्वतःची इ कॉमर्स वेबसाइट यामध्ये आपल्याला सुरुवातीला थोडाफार खर्च होऊ शकतो.

या नंतरच्या पुढील भागामध्ये आपल्या व्यवसायाची आपण वेबसाइट कशी बनवायची याबद्दल आपण माहिती घेणार आहोत ते पण मोफत फ्री.

काही सूचना असतील तर आपण sachinppatange@gmail.com या ईमेल वरती दयाव्यात… मी प्रथमच लिहण्याचा प्रयत्न करीत आहे .. आपल्या सर्वांच्या मनातील प्रश्न आणि उत्तरे मांडण्याचं प्रयत्न करत आहे ..

धन्यवाद…!

 

]]>
https://www.sachinpatange.com/2022/01/05/from-a-job-to-your-own-e-commerce-business-part-5/feed/ 0
नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसायाकडे ( भाग ४ ) https://www.sachinpatange.com/2022/01/04/from-a-job-to-your-own-e-commerce-business-part-4/ https://www.sachinpatange.com/2022/01/04/from-a-job-to-your-own-e-commerce-business-part-4/#respond Tue, 04 Jan 2022 15:48:53 +0000 https://www.sachinpatange.com/?p=57 नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसायाकडे ( भाग ४ )

नमस्कार मित्रांनो मी सचिन,

नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करत असताना कालच्या भाग मध्ये आपल्याला जास्त नफा मिळवण्यासाठी आपले प्रॉडक्टची खरेदी कोठून करावी या बद्दल माहिती घेतली.

आज आपण उदाहरणासाठी बी टु बी मध्ये ऑनलाईन सेल करणारी https://www.alibaba.com/ या वेबसाइट वर अकाउंट तयार करणार आहोत.बी टु बी मध्ये ऑनलाईन सेल करणाऱ्या खूप वेबसाइट आहेत .. त्या आपण आपल्या प्रॉडक्ट नुसार अभयास करून त्या वेबसाइट वरती अकाउंट काढावे.

पण लगेच कोठेही किंवा प्रत्येक वेबसाइट वर आपला मोबाईल ईमेल आयडी नंबर शेअर करून नये .. त्या मुळे आपला डेटा सर सर्व लोकांकडे शेअर केला जातो आणि आपल्याला मार्केटिंग साठी टारगेट केले जाते विनाकारण फोन केले जातात म्हणून शक्यतो आपला देता योग्य वेबसाइट शिवाय इतरत्र शेअर करू नये हि विनंती .
सर्व ऑपशन दिसण्यासाठी मी कॉम्पुटर वरती करत आहे या प्रमाणे आपण मोबाईल वर पण करू शकता

१. वेबसाईट ओपन करावी

https://www.alibaba.com/

२. जॉईन फ्री वरती क्लिक करावे

३. भाषा इंग्रजी निवडावी आणि आपली माहिती भरावी

४. सबमिट केल्या नंतर आपल्या ईमेल आयडी वरती एक कोड येईल तो या फॉर्म मध्ये टाकून व्हेरिफाय करावे आणि आपले अकाउंट तयार झाले

अशा प्रकारे आपले अकाउंट तयार झाले आहे आता आपण निवडलेले प्रॉडक्ट याची किंमत आणि त्या साठी आपल्या पर्यंत कुरिअर चर्चेस याची माहिती नीट तपासून घ्यावी लगेच ऑर्डर करण्याची घाई नये त्याच बरोबर जास्त किमतीचे पण ऑर्डर करताना काळजी पूर्वक अभ्यास करावा

या वेबसाइट मधील जवळपास सर्व प्रॉडक्ट हे मेड इन चीन आहेत .. त्या मुळे जास्त ऑर्डर नकरता फक्त कसे येते या बाबत अभ्यास करावा

पुढील भाग मध्ये आणखी माहिती घेऊ .. धन्यवाद

काही सूचना असतील तर आपण sachinppatange@gmail.com या ईमेल वरती दयाव्यात… मी प्रथमच लिहण्याचा प्रयत्न करीत आहे .. आपल्या सर्वांच्या मनातील प्रश्न आणि उत्तरे मांडण्याचं प्रयत्न करत आहे ..

.. धन्यवाद

 

]]>
https://www.sachinpatange.com/2022/01/04/from-a-job-to-your-own-e-commerce-business-part-4/feed/ 0
नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसायाकडे ( भाग ३ ) https://www.sachinpatange.com/2022/01/03/from-a-job-to-your-own-e-commerce-business-part-3/ https://www.sachinpatange.com/2022/01/03/from-a-job-to-your-own-e-commerce-business-part-3/#respond Mon, 03 Jan 2022 14:51:19 +0000 https://www.sachinpatange.com/?p=49 नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसायाकडे ( भाग ३ )

नमस्कार मित्रांनो मी सचिन,

नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करत असताना कालच्या भाग मध्ये जास्त विकणारे किंवा खरेदीदार यांची ऑनलाईन जास्त मागणी असणारे प्रॉडक्ट हे कसे शोधायचे या बद्दल माहिती घेतली.

आजच्या भाग मध्ये आपण जे प्रॉडक्ट ऑनलाईन विक्रीसाठी निवडले आहेत ते आपल्याला जास्त नफा मिळवण्यासाठी कोठून खरेदी करावी या बद्दल माहिती घेणार आहोत..

उदा. साठी https://www.amazon.in/ या वेबसाईटवरील बेस्ट सेलर कोणते प्रॉडक्ट चा अभ्यास केला.. त्या मधून Toys & Games ही कॅटेगिरी निवडले आहे.

या मधील बेस्ट सेलर क्रमांक 5 चा प्रॉडक्ट Super Toy LCD Writing Tablet 8.5 Inch E-Note Pad हा प्रॉडक्ट मला कमी किंमती मध्ये जास्त नफा आणि कमी रिस्क मध्ये कोठे मिळू शकेल याचा अभ्यास करत असताना. लोकल होलसेल दुकानदार किंवा ऑनलाईन मध्ये पाहिले तेव्हा https://www.alibaba.com/ या वेबसाईटवर हा प्रॉडक्ट कमी किंमतीत मिळत आहेत त्याच बरोबर त्या साठी लागणार पॅकिंग आणि आपल्या पर्यंत पोहचण्यासाठी लागणार खर्च याचा अभ्यास करत आहे. वेबसाइट वरती डॉलर मध्ये किंमत दाखवत आहे म्हणून मी अँप पण इन्स्टॉल केले आहे

तर मी निवडलेला प्रॉडक्ट हा किती दर्जेदार आणि किती कमी किंमतीत मिळतो आहे या बद्दल मी आणखी सर्च करतो आहे त्याच्या लिंक मी सेव्ह करत आहे .. त्याच बरोबर किती पीस विकत घ्यावे लागतात आहे पेयमेन्ट कसे करावे या बद्दल संपूर्ण अभ्यास करत आहे .. या पुढील भागा मध्ये अकाउंट तयार करून ऑर्डर आणि पेमेंट कसे करता येईल या बद्दल माहिती घेऊ ..

काही सूचना असतील तर आपण sachinppatange@gmail.com या ईमेल वरती दयाव्यात… मी प्रथमच लिहण्याचा प्रयत्न करीत आहे .. आपल्या सर्वांच्या मनातील प्रश्न आणि उत्तरे मांडण्याचं प्रयत्न करत आहे ..
धन्यवाद…!

नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसायाकडे ( भाग १ )

Home

नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसायाकडे ( भाग २ )

नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसायाकडे ( भाग २ )

 

]]>
https://www.sachinpatange.com/2022/01/03/from-a-job-to-your-own-e-commerce-business-part-3/feed/ 0
नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसायाकडे ( भाग २ ) https://www.sachinpatange.com/2022/01/02/from-a-job-to-your-own-e-commerce-business-part-2/ https://www.sachinpatange.com/2022/01/02/from-a-job-to-your-own-e-commerce-business-part-2/#respond Sun, 02 Jan 2022 13:40:37 +0000 https://www.sachinpatange.com/?p=16 नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसायाकडे ( भाग २ )

नमस्कार मित्रांनो मी सचिन,

नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करत असताना पहिला मुख्य प्रश्न येतो कि मी ऑनलाईन काय विक्री करू ?
माझ्या कडे कोणताही प्रॉडक्ट नाही विक्री करण्यासाठी … मग मी कोठून सुरवात करू ??

या साठी आपल्या कडे दोन पर्याय आहेत.
१. आपल्याला थोडी फार माहीत असलेले प्रॉडक्ट कमी भावात ठोक विकत घेऊन ऑनलाईन विक्रीस ठेवणे.
२. किंवा आपण स्वतः प्रॉडक्ट चे उत्पादन करून ऑनलाईन विक्रीस ठेवणे.

या दोन्ही पर्यायाचा विचार करता आपली गुंतवणूक आणि आपला वेळ तर मी म्हणेन पहिला पर्याय बरा आहे सुरवात करताना. आपल्याला जास्त गुंतवणूक नाही आणि ट्रायल करायला हरकत नाही ..!

कोणते प्रॉडक्ट ऑनलाईन जास्त ऑर्डर करतात ? कोणत्या प्रॉडक्ट ला ऑनलाईन जास्त मागणी आहे ? कोणत्या प्रॉडक्ट मध्ये जास्त मार्जिन आहे? कोणत्या प्रॉडक्ट ला लोक जास्त सर्च करता ?

हे सर्व शोधायचे कसे या साठी आपण सुरवात हि अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईट पासून करूयात. अमेझॉन हि एक मल्टि व्हेंडर ई-कॉमर्स वेबसाइट आहे. मग मल्टि व्हेंडर म्हणजे काय ? ज्या वेबसाइट वरती विक्री करणारे (सेलर) हे मोठया प्रमाणात असतात. या वेबसाइट सर्व सेलरचे प्रॉडक्ट लिस्ट केलेले असतात.
जेव्हा आपण ऑनलाईन एखादा प्रॉडक्ट सर्च करतो तेव्हा आपल्याला वेग वेगळ्या सेलरचे प्रॉडक्ट सर्व एका ठिकाणी दिसतात .. या मधील प्रॉडक्ट ची किंमत आणि त्याचा दर्जा हे तपासून आपण ऑर्डर करत असतो.

अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटवर आपण कोणते प्रॉडक्ट जास्त विक्री झाले आहे याचा प्रथम अभ्यास करणार आहोत . त्या साठी https://www.amazon.in/ या वेबसाइट वरील लोगो शेजारील मेनू वरती क्लिक करून बेस्ट सेलर्स Best Sellers वरती क्लिक करणार आहोत. त्या नंतर आपल्या समोर विविध कॅटेगरी येतील त्या मध्ये आपल्याला आवड असणारे किंवा आपल्याला विक्री साठी सहज ठोक भावात मिळू शकणारी कॅटेगरी निवडावी

Baby Products, Bags, Wallets and Luggage, Beauty, Books, Car & Motorbike, Clothing & Accessories, Computers & Accessories, Electronics, Garden & Outdoors, Gift Cards, Grocery & Gourmet Foods, Health & Personal Care, Home & Kitchen, Home Improvement, Industrial & Scientific, Jewellery, Kindle Store, Movies & TV Shows, Music, Musical Instruments, Office Products, Pet Supplies, Shoes & Handbags, Software, Sports, Fitness & Outdoors, Toys & Games, Video Games, Watches

उदा. Clothing & Accessories किंवा Toys & Games

Clothing कपडे हे निवडण्याच्या मागचे करण आहे कि मी जेव्हा सर्च केले कि best online selling products in india त्या बरोबर आणखी या प्रमाणे मी वेबसाईट ला व्हिजिट केलो तेव्हा असे लक्षात आले कि लोक ऑनलाईन कपडे खूप ऑर्डर करता. उदा. https://ithinklogistics.com/blog/top-10-most-demanded-top-selling-products-in-india-online-2021/ आणखी मला विक्री साठी सोप्या पद्धतीने आणि जास्त गुंतवणूक न करता Clothing या मध्ये काही प्रॉडक्ट ऑनलाईन विक्री करता येऊ शकता .. हा माझा विचार आहे .. त्या पद्धतीने आपण सर्व जण वेगवगळ्या व्यवसायात नोकरी करतो आहेत तर सर्वांची निवड हि वेगवेगळी असू शकते.जसे Toys & Games पण आहे कि ज्याला जास्त मागणी आहे आणि सोप्या पद्ध्तीने आपण विक्री साठी ऑनलाईन ठेवू शकतो.

आता Best Sellers प्रॉडक्ट चा अभ्यास केल्या नंतर आपण काही प्रॉडक्ट निवडूयात .. त्याच्या ऑनलाईन वेबसाइट वरील किंमत आणि आपल्याला ठोका भावात कमी किंमतीत सहज मिळणारे आणि सहज कुरिअरने पाठवू शकणारे प्रॉडक्ट यांचा अभ्यास करू यात .. आणि जास्त मार्जिन देणारे प्रॉडक्ट यांची निवड करूयात. तर अशा या ई-कॉमर्स चा वापर करून ऑनलाईन व्यवसाय कसा सुरु करू शकतो. .. या बद्दल आणखी माहिती पुढील भागा मध्ये ..

काही सूचना असतील तर आपण sachinppatange@gmail.com या ईमेल वरती दयाव्यात… मी प्रथमच लिहण्याचा प्रयत्न करीत आहे .. आपल्या सर्वांच्या मनातील प्रश्न आणि उत्तरे मांडण्याचं प्रयत्न करत आहे ..

धन्यवाद…!

नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसायाकडे ( भाग १ ) 

https://www.sachinpatange.com/

 

 

]]>
https://www.sachinpatange.com/2022/01/02/from-a-job-to-your-own-e-commerce-business-part-2/feed/ 0
नोकरीकडून स्वतःचा ई कॉमर्स व्यवसायाकडे ( भाग १ ) https://www.sachinpatange.com/2022/01/01/from-a-job-to-your-own-e-commerce-business-part-1/ https://www.sachinpatange.com/2022/01/01/from-a-job-to-your-own-e-commerce-business-part-1/#respond Sat, 01 Jan 2022 14:32:17 +0000 https://www.sachinpatange.com/?p=12 नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसायाकडे ( भाग १ )

नमस्कार मित्रांनो मी सचिन,
आपल्या बरोबर नोकरीकडून स्वतःचा ई कॉमर्स व्यवसायाकडे या बद्दलचे माझे काही अनुभव आणि माहिती शेअर करणार आहे.

मी ग्राफिक्स डिझाईन आणि वेब डिझाईन या क्षेत्रात २०१० पासून कार्यरत आहे. माझ्या फार्म च्या माध्यमातून २०१३ पासून असंख्य ग्राहकांना सेवा देत आहे.

आपण सर्व जण वेगवेगळ्या क्षेत्रात त्याच बरोबर वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करत असतो. पण नोकरी करत असताना आपल्याला आपला व्यवसाय सुरु करावा असे नेहमी वाटते. कधी कधी वरिष्ठ यांच्या बरोबर काम करत असतानां जास्तचं वाटते कि मी इथे नोकरी का करतो .. माझा एखादा छोटा व्यवसाय राहावा.

पण आपण आपल्या वर असणाऱ्या जबाबदाऱ्या मुळे लगेच नोकरी सोडू शकत नाही .. पण नेहमी वाटत कि आपण काही तरी व्यवसाय करावा ..

व्यवसाय म्हटल कि प्रथम येते भांडवल आता त्याची जुळवाजुळव कशी तरी करू .. पण आपल्या चालू नोकरीतील आपल्या व्यवसायासाठी आपला वेळ.. मग या सर्व अडचणी वरती आपण काय करू शकतो. असा विचार आपण किती दिवस करणार ..
कोठून तरी सुरवात करायला पाहिजे पण काय करणार..

आज आपण सर्व जण ऑनलाईन ऑर्डर करून शॉपिंग करू शकतो … मग आपण विकू का शकत नाही ..

मला स्वतःला तरी असं वाटत की काही न करण्या पेक्षा काही तरी करून बघू … जास्तीत जास्त काय होईल आपल्याला अनुभव येईल … काही करून पाहिल्याचा आनंद मिळेल.

आता व्यावसायिकाला ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कुठे दुकान किंवा शोरूम करायची गरज नाहीये तर या ई-कॉमर्स चा मी माझी चालू नोकरी करत करत ई-कॉमर्स व्यवसाय कसा सुरु करू शकतो.

ई-कॉमर्स म्हणजे काय ?
सध्या भाषेत सांगायचे झाले तर आपण सर्वजण अमेझॉन किंवा इतर वेबसाईट वरून विविध वस्तू मागवता … आणि कुरिअरने घरपोच झाल्या वर किंवा ऑनलाईन पेयमेन्ट करता. या सर्व प्रोसेस ला टेक्निकल भाषेत ईकॉमर्स म्हणतो.

तर अशा या ई-कॉमर्स चा वापर करून व्यवसाय कसा सुरु करू शकतो. .. या बद्दल मी आणखी माहिती पुढील भागा मध्ये देणार आहे ..

काही सूचना असतील तर आपण sachinppatange@gmail.com या ईमेल वरती दयाव्यात… मी प्रथमच लिहण्याचा प्रयत्न करीत आहे .. आपल्या सर्वांच्या मनातील प्रश्न आणि उत्तरे मांडण्याचं प्रयत्न करत आहे ..

धन्यवाद…!

Home

सौजन्य इमेज : https://image.freepik.com/free-vector/successful-businessman-celebrating-victory_1150-39772.jpg

]]>
https://www.sachinpatange.com/2022/01/01/from-a-job-to-your-own-e-commerce-business-part-1/feed/ 0
2021: Thank you for the lessons. 2022: I am ready https://www.sachinpatange.com/2021/12/31/2021-thank-you-for-the-lessons-2022-i-am-ready/ https://www.sachinpatange.com/2021/12/31/2021-thank-you-for-the-lessons-2022-i-am-ready/#respond Fri, 31 Dec 2021 13:59:26 +0000 https://www.sachinpatange.com/?p=8 2021: Thank you for the lessons.
2022: I am ready

Wishing all a happy,
healthy and prosperous 2021!

]]>
https://www.sachinpatange.com/2021/12/31/2021-thank-you-for-the-lessons-2022-i-am-ready/feed/ 0