Sachin Patange

Free Software for Creators - Digital Initiatives In Higher Education

नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसायाकडे ( भाग १ )

नमस्कार मित्रांनो मी सचिन,
आपल्या बरोबर नोकरीकडून स्वतःचा ई कॉमर्स व्यवसायाकडे या बद्दलचे माझे काही अनुभव आणि माहिती शेअर करणार आहे.

मी ग्राफिक्स डिझाईन आणि वेब डिझाईन या क्षेत्रात २०१० पासून कार्यरत आहे. माझ्या फार्म च्या माध्यमातून २०१३ पासून असंख्य ग्राहकांना सेवा देत आहे.

आपण सर्व जण वेगवेगळ्या क्षेत्रात त्याच बरोबर वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करत असतो. पण नोकरी करत असताना आपल्याला आपला व्यवसाय सुरु करावा असे नेहमी वाटते. कधी कधी वरिष्ठ यांच्या बरोबर काम करत असतानां जास्तचं वाटते कि मी इथे नोकरी का करतो .. माझा एखादा छोटा व्यवसाय राहावा.

पण आपण आपल्या वर असणाऱ्या जबाबदाऱ्या मुळे लगेच नोकरी सोडू शकत नाही .. पण नेहमी वाटत कि आपण काही तरी व्यवसाय करावा ..

व्यवसाय म्हटल कि प्रथम येते भांडवल आता त्याची जुळवाजुळव कशी तरी करू .. पण आपल्या चालू नोकरीतील आपल्या व्यवसायासाठी आपला वेळ.. मग या सर्व अडचणी वरती आपण काय करू शकतो. असा विचार आपण किती दिवस करणार ..
कोठून तरी सुरवात करायला पाहिजे पण काय करणार..

आज आपण सर्व जण ऑनलाईन ऑर्डर करून शॉपिंग करू शकतो … मग आपण विकू का शकत नाही ..

मला स्वतःला तरी असं वाटत की काही न करण्या पेक्षा काही तरी करून बघू … जास्तीत जास्त काय होईल आपल्याला अनुभव येईल … काही करून पाहिल्याचा आनंद मिळेल.

आता व्यावसायिकाला ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कुठे दुकान किंवा शोरूम करायची गरज नाहीये तर या ई-कॉमर्स चा मी माझी चालू नोकरी करत करत ई-कॉमर्स व्यवसाय कसा सुरु करू शकतो.

ई-कॉमर्स म्हणजे काय ?
सध्या भाषेत सांगायचे झाले तर आपण सर्वजण अमेझॉन किंवा इतर वेबसाईट वरून विविध वस्तू मागवता … आणि कुरिअरने घरपोच झाल्या वर किंवा ऑनलाईन पेयमेन्ट करता. या सर्व प्रोसेस ला टेक्निकल भाषेत ईकॉमर्स म्हणतो.

तर अशा या ई-कॉमर्स चा वापर करून व्यवसाय कसा सुरु करू शकतो. .. या बद्दल मी आणखी माहिती पुढील भागा मध्ये देणार आहे ..

काही सूचना असतील तर आपण sachinppatange@gmail.com या ईमेल वरती दयाव्यात… मी प्रथमच लिहण्याचा प्रयत्न करीत आहे .. आपल्या सर्वांच्या मनातील प्रश्न आणि उत्तरे मांडण्याचं प्रयत्न करत आहे ..

धन्यवाद…!

Home

सौजन्य इमेज : https://image.freepik.com/free-vector/successful-businessman-celebrating-victory_1150-39772.jpg

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *