Sachin Patange

Free Software for Creators - Digital Initiatives In Higher Education

नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसायाकडे ( भाग २ )

नमस्कार मित्रांनो मी सचिन,

नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करत असताना पहिला मुख्य प्रश्न येतो कि मी ऑनलाईन काय विक्री करू ?
माझ्या कडे कोणताही प्रॉडक्ट नाही विक्री करण्यासाठी … मग मी कोठून सुरवात करू ??

या साठी आपल्या कडे दोन पर्याय आहेत.
१. आपल्याला थोडी फार माहीत असलेले प्रॉडक्ट कमी भावात ठोक विकत घेऊन ऑनलाईन विक्रीस ठेवणे.
२. किंवा आपण स्वतः प्रॉडक्ट चे उत्पादन करून ऑनलाईन विक्रीस ठेवणे.

या दोन्ही पर्यायाचा विचार करता आपली गुंतवणूक आणि आपला वेळ तर मी म्हणेन पहिला पर्याय बरा आहे सुरवात करताना. आपल्याला जास्त गुंतवणूक नाही आणि ट्रायल करायला हरकत नाही ..!

कोणते प्रॉडक्ट ऑनलाईन जास्त ऑर्डर करतात ? कोणत्या प्रॉडक्ट ला ऑनलाईन जास्त मागणी आहे ? कोणत्या प्रॉडक्ट मध्ये जास्त मार्जिन आहे? कोणत्या प्रॉडक्ट ला लोक जास्त सर्च करता ?

हे सर्व शोधायचे कसे या साठी आपण सुरवात हि अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईट पासून करूयात. अमेझॉन हि एक मल्टि व्हेंडर ई-कॉमर्स वेबसाइट आहे. मग मल्टि व्हेंडर म्हणजे काय ? ज्या वेबसाइट वरती विक्री करणारे (सेलर) हे मोठया प्रमाणात असतात. या वेबसाइट सर्व सेलरचे प्रॉडक्ट लिस्ट केलेले असतात.
जेव्हा आपण ऑनलाईन एखादा प्रॉडक्ट सर्च करतो तेव्हा आपल्याला वेग वेगळ्या सेलरचे प्रॉडक्ट सर्व एका ठिकाणी दिसतात .. या मधील प्रॉडक्ट ची किंमत आणि त्याचा दर्जा हे तपासून आपण ऑर्डर करत असतो.

अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटवर आपण कोणते प्रॉडक्ट जास्त विक्री झाले आहे याचा प्रथम अभ्यास करणार आहोत . त्या साठी https://www.amazon.in/ या वेबसाइट वरील लोगो शेजारील मेनू वरती क्लिक करून बेस्ट सेलर्स Best Sellers वरती क्लिक करणार आहोत. त्या नंतर आपल्या समोर विविध कॅटेगरी येतील त्या मध्ये आपल्याला आवड असणारे किंवा आपल्याला विक्री साठी सहज ठोक भावात मिळू शकणारी कॅटेगरी निवडावी

Baby Products, Bags, Wallets and Luggage, Beauty, Books, Car & Motorbike, Clothing & Accessories, Computers & Accessories, Electronics, Garden & Outdoors, Gift Cards, Grocery & Gourmet Foods, Health & Personal Care, Home & Kitchen, Home Improvement, Industrial & Scientific, Jewellery, Kindle Store, Movies & TV Shows, Music, Musical Instruments, Office Products, Pet Supplies, Shoes & Handbags, Software, Sports, Fitness & Outdoors, Toys & Games, Video Games, Watches

उदा. Clothing & Accessories किंवा Toys & Games

Clothing कपडे हे निवडण्याच्या मागचे करण आहे कि मी जेव्हा सर्च केले कि best online selling products in india त्या बरोबर आणखी या प्रमाणे मी वेबसाईट ला व्हिजिट केलो तेव्हा असे लक्षात आले कि लोक ऑनलाईन कपडे खूप ऑर्डर करता. उदा. https://ithinklogistics.com/blog/top-10-most-demanded-top-selling-products-in-india-online-2021/ आणखी मला विक्री साठी सोप्या पद्धतीने आणि जास्त गुंतवणूक न करता Clothing या मध्ये काही प्रॉडक्ट ऑनलाईन विक्री करता येऊ शकता .. हा माझा विचार आहे .. त्या पद्धतीने आपण सर्व जण वेगवगळ्या व्यवसायात नोकरी करतो आहेत तर सर्वांची निवड हि वेगवेगळी असू शकते.जसे Toys & Games पण आहे कि ज्याला जास्त मागणी आहे आणि सोप्या पद्ध्तीने आपण विक्री साठी ऑनलाईन ठेवू शकतो.

आता Best Sellers प्रॉडक्ट चा अभ्यास केल्या नंतर आपण काही प्रॉडक्ट निवडूयात .. त्याच्या ऑनलाईन वेबसाइट वरील किंमत आणि आपल्याला ठोका भावात कमी किंमतीत सहज मिळणारे आणि सहज कुरिअरने पाठवू शकणारे प्रॉडक्ट यांचा अभ्यास करू यात .. आणि जास्त मार्जिन देणारे प्रॉडक्ट यांची निवड करूयात. तर अशा या ई-कॉमर्स चा वापर करून ऑनलाईन व्यवसाय कसा सुरु करू शकतो. .. या बद्दल आणखी माहिती पुढील भागा मध्ये ..

काही सूचना असतील तर आपण sachinppatange@gmail.com या ईमेल वरती दयाव्यात… मी प्रथमच लिहण्याचा प्रयत्न करीत आहे .. आपल्या सर्वांच्या मनातील प्रश्न आणि उत्तरे मांडण्याचं प्रयत्न करत आहे ..

धन्यवाद…!

नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसायाकडे ( भाग १ ) 

https://www.sachinpatange.com/

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *